Thursday, August 16, 2012

home

 (Match Making)        var   आणि  vadhu
                
श्री दिर्बा देवी-रामेश्वर प्रसंन्न (जामसंडे, देवगड)यांना स्मरण करुन या 'घाडीमाझीओळख' या संकल्पनाला आकार देतो आहे. समस्थ घाडी परिवार आणि बधुंणच्या आर्शिवादने आपल्या सेवेत अर्पण करीत आहोत. अभिमानाने आम्ही सांगतो माझी ओळख घाडी आहे, कोकणातला हाच घाडीगांवकर कोकणात शतको वसलेला आहे आणि बारापाचात गावह्राठी मध्ये मह्त्वाचे काम प्रमुखाने नेमून दिले आहे, पुवीच्या काळात कामाची वाटणी ही प्रत्येकाची उपजत गुणवत्ता पाहुन केली जात असे , प्रत्येक गोष्ट ही नैसर्गिकतेचा तो बिघडवता केली जात असे. बारा पाच संप्रदायात प्रमुख पदाचे/ नेतृत्वाचे काम ज्याने केले त्याच्या कडे पुर्वसत्ता/राजसत्ता पदराहील्र आणि आनुवंषितेच्या नियमानुसार त्याच्या पिठित चालत राहिले. त्यानंतर गावह्राठी मध्ये मह्त्वाची अशी तीन कामे प्रमुखाने नेमून दिली. ती म्हारकी, घाडकी आणि गुरवकी हे तिन्ही शब्द कर्म वाचक असुन कालांतराने त्याला आडनावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. म्हारकी करणारा तो महार , घाडकी करणारा तो घाडी आणि गुरवकी करणारा तो गुरव. यातुन आपल्या एक गोष्ट लक्षात  येईल की जे लोक स्वत:ला गुरव, घाडी, महार म्हणवतात त्यांच्या पूर्वजांची आडनावे वेगळी होती. दुस-या अर्थाने हे सर्वजण मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ किंवा मी आधी की तू आधी या वादात गुंतले आहेत. ते सर्व मानव वंशराज्य सिध्दांतानुसार एकाच प्रकृती पुरुषांची संताने आहेत . गुणकर्मानुसार त्यांना मिळलेली मार्ग अनेक वर्ष करीत राहील्याने त्याच्या कामात प्रत्यकाने प्रावीण्या मिळविले. त्या त्या कार्यारही/ कर्माशी निगडित शक्ती त्यांच्या मध्ये निर्माण झाली आणि अनुवंशिकीच्या ( निर्सग नियमानुसार) त्यांच्यस पुठील पिठित ती संक्रमित होत गेली. असे आपले घाडी नाव पडले आसावे बहुदा आज देवाची सेवा करने हे फार मोठे पुण्यांचे काम घाडीगांवकर यांचाकडे आहे.                
ब्रिटिशांच्या काळात १९२५ साली श्री शंकरराव सोनू घाडीगांवकर यांनी आणि सहयोगी कार्यक्रतानी मिळुन स्थापना केली ही एक मोठी क्रांति होती आणि आज ती आपण घाडीगांवकरांनी 'घाडीदिन' म्हणून साजरा करावा.उपक्रम तर खुप केले होते, पण १९६९ ला स्वता:ची जागा घेऊन यशाकडे दुसरे पाहुल पडले होते. त्यानंतर समाज कार्यक्रतानी बरीच कामे सुरूकेली आणि १९८० ला पहिली क्ष..घाडीगांवकर सहकारी पदपेढी संस्था चालु करणाचे उधिष्ट होते समाजिक उन्नती, आर्थिक प्रगती   आज शाखा आहेत.  आज स्थापना झाल्यापासुन ८७ वर्ष आपल्या समाजाला झाली. संस्थेमार्फत सामाजिक उन्नती, सांस्कृतीक, शैक्षणिक महिला वर्ग आणि वधु-वर परिचय या सारखे उपक्रम राबवून समाजामध्ये बरीच विक्षण प्रगती केली आहे हे खरोकर अभिनंदनीय आहे.आज प्रगती झपाट्याने होते आहे. तरीही विकास दूरपर्यत पोहचलेला नाही. त्यामुळे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, उन्नतीमध्ये समाजात नेहमीच विषमता आढळ्ते. या परिस्थितीत ही समाज मार्गक्रमण करीत आहे आणि आपल्या समाजाला विषेश मार्गदर्शन पाहिजे आहे.आपल्या समृद्ध कोकणातील भंडारी समाज, गुरव समाज, तेली समाज, मरठा समाज ब्राह्माण समाज आणि इतर असे कित्येक समाजांनी आपले अस्तित्व मजबूत केले आहे हे आपल्या समाजानी लक्षात घेवून समाज संघटित करण्याचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून.ज्या समाजात जन्म घेतला, त्या समाजासाठी आपण कांहीतरी योगदान केले पाहीजे या दृष्टीकोणातुन मी हे संकल्पना आपल्या साठी या माध्यमातून सुरु करीत आहे. हाच आपला घाडी समाज आणि समाजा बद्दल काही माहिती आपल्या कडे असेल तर आम्हास कळवा. आम्हास पुर्ण खात्री आहे कि या मार्गातुन आम्ही समाजासाठी काही तरी करु...



मातेच्या कृपेने मी आज येथे आहे आणि मी हे एक शुभ कार्यक्रम हाती घेतला आहे. मार्गदर्क्षण , माहीति, उपक्रम हाती घेऊणा आज मी आपल्या सोबत या वेब साईट मार्फत आपल्या सेवेत उपस्थित आहे. मी "मामघाडी गणेश " मु. पो. जामसंडे, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग , महाराष्ट्र सदया राह्याला मुंबई येथे बोरिवलि पुर्वेला उपजीविका करीत आहे. गेल्या वर्षा विवाह सेवा चालहुण समाजाचे एक मोठे काम करतो आहे. आज वर जरासा डाग या काळिम्बा फासुन नाही घेतलि. काम करायचे तर अचूक या दुष्टिचा आहे मी. आता समाजा साठी काही तरी करावे  असे वाढते म्हणून हे क्षेत्र निवड केली आहे , समाजाचा सहयोग मिळेल अशी आशा करतो आणि देवा जवळ प्रार्थणा . माझे स्वप्न आहे कि आपला समाज जगा समोर यावा , समाजातिल सर्व लोकांणा सर्व तरेची मद्दत योग्य असे सल्ला मिळावा. जेणे करुन आर्थिक परिस्थिती सुधारवी, समृध्दि , उन्नति ह्वावी. इतर समाजा पुढे आपल्या समाजाचे पहिले नाव असावे.
 माझ्या बद्दल काय सांगु, सर्व तर ओळखतात समाजाचे एक कार्यक्रम मी राबवीतो, आम्हाचे नाव असे कसे तर आपच्या गावात तिन ओखले आहेत घाडीचे.. कोयघाडी मामघाडी घाडी .इतराचे सोडा आम्ही गावात मानाचे घाडी म्हणुन 'मामघाडी'. गेली साडेतिनसे हुन आथिक वर्षे जामसंडे या गावात राहातात आहे. असा गावाचा इतिहास सांगतो , गाव समृध्द असल्या मुळे , गावच्या घाडयाची परिस्तिती ही खुपच चांगली आहे , देवीची कृपादुष्टि आहे.
 आज ही वेब साईड आपल्या प्रगति साठी या माहीति साठी चालु करण्यात आली आहे याचि नोंद घ्यावी आणि आपल्या बद्दल , समाज्या बद्दल , विकासा बद्दल काही प्रकशित करयचे असेल तर अवश्य संर्पक साधावा. मी सदव्य तुमच्या आपल्या बरोबर आहे. उपक्रम ही आहेत माझ्या परिणे जे साध्य करता येईल ते करीण. एक संघटणा स्थापण करायची आहे, आपला परिचय आपल्या लोकंशीच करुन द्यायचा आहे.   आपल्या समृध्द कोकणातील भंडारी समाज, गुरव समाज, तेली समाज, मराठा समाज, ब्राम्हाण समाज , बौध्द समाज  असे कित्येक समाजांनी आपले अस्तित्व मजबूत केले आहे  आपण कोठे आहे. याच विचारांनी प्रगती साठी काही उपक्रम हाती घेतले आहेत. वधु-वर विवाह संस्कर, शैक्षिणिक मार्गदर्शन मद्दत आर्थिक आरोग्या या साठी  शिबिर आयोजन मद्दत कार्य. हि एक विकासाचि पहिली पाहिरि असेल माझ्या साठी हे साध्य झाल्यास मी समजेन माझे कार्य मार्गी लागले.
 मी घाडी आहे याचा मला गर्व आहे, मी मराठा आहे धर्मासाठी , समाजा साठी आज लोक झगडत आहे, आज आपण नशिबवान आहोत का आपला समाज लहान आहे पण एक विलक्षण अशी समाजाचि बांधिलीकी आहे .ओळ्ख एक शब्द 'घाडी' की आपला परिचय पुर्ण होतो. मग आहे की नाही आपला समाज उच्च आणि एकजुट , याचा आभिमान ठेऊन बोलावे या हक्काने सांगावे आम्ही घाडी आहोत.....


सर्व प्रथम आपल्या सेवेत सर्वात महत्वाचे वधु-वर शोध...अधिक माहिती साठी - 9820214437 or 
ganeshvsm@yahoo.com ; gmamghadi@yahoo.com


समाजा साठी काहीतरी करायची इच्छा असेल तर आम्हाला संर्पक करा. 
श्री.गणेश मामघाडी. ( जामसंडे, देवगड ) मुंबई. 9820214437, 9869723861.
whats app 9892561941
vadhu / var  infomation   saptahik  

1 comment: